तणावग्रस्तांकडून होत आहे फेसबूकचा सर्वाधिक वापर


मुंबई : जगातील कोणत्याही कोपऱ्यातील माणसाला जवळ आणणे हा सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या फेसबूकचा उद्देश आहे. पण हेच फेसबूक अनेकांसाठी व्यसन बनले आहे. अनेकजण फेसबूकमुळे मनोरंजनाऐवजी तणावात जात आहेत. एका सर्वेक्षणावर नजर टाकली तर हे बघायला मिळते.

तणावात जी माणसे नेहमी असतात फेसबुक, इन्स्टाग्रामवर किंवा सोशल मीडिया साइट्सवर वेळ घालवण्याची सवय त्यांना लागते. स्मार्ट फोनमुळे सध्या एका क्लिकवर अपडेट मिळतात आणि माहितीसह मनोरंजन फेसबुक गुगल इन्स्टाग्रामवर होते, त्यामुळे विविध वयोगटातील लोक ह्याचे युजर्स आहेत.

अभ्यासकांनी या रिसर्चसाठी ऑनलाइन सर्व्हेच्या निष्कर्षांचे विश्लेषण केले. ज्यात १८ ते ५६ वयोगटातील ३०९ फेसबुक यूजर्सना सहभागी करून घेण्यात आले होते. सायकियाट्री रिसर्च नावाच्या जर्नलमध्ये या रिसर्चचे निष्कर्ष प्रकाशित झाले आहेत. या रिसर्चमध्ये सहभागी लोकांना अभ्यासकांनी प्रश्न विचारला की, त्यांचा स्ट्रेस लेव्हल कमी करण्यात सोशल नेटवर्किंग साइट्स किती मदत करतात आणि तसेच स्ट्रेस असताना ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्हीकडे त्यांना किती सपोर्ट मिळतो. सोबतच यूजर्सना असेही विचारण्यात आले की, ते दररोज फेसबूकवर किती वेळ घालवतात? आणि जेव्हा ते ऑनलाइन नसतात तेव्हा त्यांना कसे वाटते?

जेवढा जास्त स्ट्रेसचा स्तर होता, ती व्यक्ती फेसबूकवर तेवढा जास्त वेळ घालवत होती. रोजच्या स्ट्रेसची गंभीरता आणि फेसबूक इंगेजमेंटमध्ये सकारात्मक नाते आहे. ज्यामुळे हे म्हटले जाऊ शकते की, सोशल नेटवर्किंग साइट्सची सवय स्ट्रेसमुळे लागते. अनेकदा त्यावर अवलंबून रहावे लागते. पण तणावाचा जर सामना करायचा असेल आणि व्यक्तीला परिवार आणि मित्रांची मदत मिळत असेल तर ही सवय कमी केली जाऊ शकते.

Leave a Comment