
मुंबई – मिझोरामच्या राज्यपालपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची नियुक्ती करण्यात आली असून शिवसेनेच्या वाट्याला पहिल्यांदाच राज्यपाल पद आले आहे.
मिझोरामच्या राज्यपालपदी शिवसेना नेते लिलाधर डाके यांची नियुक्ती
एनडीएत मोठा घटक पक्ष असताना देखील केवळ एकच मंत्रीपद शिवसेनेला देण्यात आले. त्यातही अवजड उद्योग मंत्रीपद हे शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांना देण्यात आले. यामुळे नाराज असलेल्या शिवसेनेला शांत करण्यासाठी लिलाधर डाके यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
मित्र व घटक पक्षांना अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना महत्त्वाचे स्थान दिले जात होते. पण घटक पक्षांबाबत भाजप आता आक्रमक झालेली दिसत असल्याचे दिसून येत आहे.
