५ जुलैला मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प


नवी दिल्ली – नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत धडाकेबाज विजय मिळवल्यानंतर गुरुवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. २४ जणांनी कॅबिनेट आणि ३३ जणांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून यावेळी शपथ घेतली. काल मंत्र्यांना खातेवाटप जाहिर केल्यानंतर आता अर्थसंकल्पाची तारीखही ठरवण्यात आली. ५ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

त्याचबरोबर निर्मला सीतारमण या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. १९७० ते १९७१ या दरम्यान इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदासोबतच अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. निर्मला सीतारमण शेतकऱ्यांसाठीची धोरणे, रोजगार, शिक्षण आणि सध्या पटरीवरुन खाली उतरलेल्या औद्योगिक क्षेत्रासाठी कोणत्या योजना सादर करणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. निवडणुकीत प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनातील किती आश्वासने या अर्थसंकल्पात नरेंद्र मोदी सरकार पूर्ण करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Comment