दयाबेनाच्या दारी अवतरली लाखमोलाची ऑडी


दया भाभीचे पात्र ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये साकारणारी अभिनेत्री दिशा वाकाणीने आपल्या नवीन कारचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोसोबत तिने एक कॅप्शन लिहीले, माझी कार ऑडी. पण गाडीचे कोणते मॉडेल तिने खरेदी केले आहे, हे दिशाने सांगितलेले नाही, पण फोटो पाहिल्यानंतर हे ऑडी क्यू 5 किंवा क्यू 7 असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या गाडीची मुंबईमध्ये किंमत 66 लाखांपासून 96 लाखांच्या घरात आहे.

View this post on Instagram

#mycaraudi

A post shared by Disha Vakani & Dilip Joshi (@disha_vakani) on


2008 पासून ‘तारक मेहता का उलटा चश्मा’मध्ये दिशा काम करत आहे. तिने सप्टेंबर 2017 मध्ये मॅटर्निटी लिव्ही घेतली. तेव्हा अशी चर्चा होती की, पाच ते सहा महिन्यात ती परत शोमध्ये येईल. दिशाने नोव्हेंबर 2017 मध्ये एका मुलीला जन्म दिला. पण आता दिढ वर्षे झाली तर ती शोमध्ये परत आली नाही. अशी चर्चा काही दिवसांपूर्वी होती की, 18 मे रोजी ती शोमध्ये परत येईल, पण या सगळ्या अफवा ठरल्या.

दिशाने काही दिवसांपूर्वी जेव्हा सोशल मीडियावर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन होस्ट केले होते, बहुतेक फॅन्सनी तेव्हा तिला शोमध्ये परत कधी येणार अशी विचारणा केली होती. दिशाने त्यानंतर नाराज होऊन त्याला उत्तर लिहीले होते, कृपया मला वेळ द्या. सोशल मीडिया युझर्सनेही हे पाहून तिला ट्रोल केले. एका युझरने लिहीले, तुमच्यात इतका इगो असेल हे माहित नव्हते. तुमचे फॅन्स फक्त शोमध्ये परत कधी येणार हे विचारत आहेत. एवढ्यावरच तुम्ही चिडला.

Leave a Comment