हॅरी पॉटरच्या वेशभूषेत लग्न करणाऱ्या दांपत्याला भेटवस्तू म्हणून मिळाले घुबड


लंडन (ब्रिटन) – हॅरी पॉटरची क्रेझ अद्यापही कायम असल्याचे उदाहरण नुकतेच ब्रिटनमध्ये पाहायला मिळाली. नुकतेच येथील एका दांपत्याने वेगळ्याच शैलीत आपला विवाहसोहळा पार पाडला. आपल्या लग्नात हे जोडपे हॅरी पॉटर सिरीजमधील आपल्या आवडत्या व्यक्तिरेखेचे पोशाख परिधान करून एकमेकांचे जोडीदार बनले. 31 वर्षीय मॅथ्यू टिपरने हॅरी पॉटर तर 34 वर्षीय रिया क्रिंगिसने हर्माइनीची यूल बॉलवाली ड्रेस परिधान केला होता. हॅरी पॉटर सीरीजचे रिया आणि मॅथ्यू दोघेही प्रचंड चाहते आहेत.

हीच थीम लग्नात ठेवण्यात आली होती. एक जोडपे या लग्नात हॅरी पॉटरच्या वेशात दाखल झाले होते आणि हॅरी पॉटर बनलेल्या मॅथ्यूला त्यांनी एक घुबड भेट म्हणून दिले. आमचे या व्यक्तिरेखांच्या पोशाखात लग्न करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद नव दाम्पत्याने व्यक्त केला. ते हनीमूनला जाण्यापूर्वी आता वाटफोर्ड येथील हॅरी पॉटर स्टुडिओचा दौरा करणार आहेत.

Leave a Comment