असे आहे मोदींच्या मंत्रिमंडळातील गरीब मंत्र्याचे राहणीमान


नुकत्याच पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात गरीब खासदाराने शपथ घेतली. आज आम्ही मोदी सरकारमधील त्या खासदाराबद्दल जो सर्वात गरीब आहे. विश्वास नाही ना बसत तुमचा… पण हे खरे आहे.

त्या सर्वात गरीब खासदाराचे नाव प्रदीपचंद्र सारंगी असे असून त्यांना ओडिशाचे मोदी म्हणून देखील ओळखले जाते. त्यांचे घर आज देखील गवताने शाकारलेले आणि मातीचे आहे. नरेंद्र मोदींच्या नव्या कॅबिनेटमध्ये ओडिशाचे खासदार प्रदीपचंद्र सरंगी यांचा समावेश झाला आहे. लघु-मध्यम उद्योग खाते आणि पशु-मत्स्यपालन दुग्ध व्यवसाय खात्याचे राज्यमंत्रिपद त्यांच्याकडे आहे.

ओडिशाच्या किनारी भागातील सारंगी हे लोकप्रिय आणि आत्मीयतेने काम करणारे भाजप कार्यकर्ते आहेत. दोन वेळा ते आमदार म्हणूनही निवडून आले आहेत आणि आता खासदार म्हणून दिल्लीत गेले आहेत. त्यांची अत्यंत साधी राहणी, सायकलवरून फिरणे ही ओळख. त्यांचे बालासोर जिल्ह्यातील निलगिरीजवळचं गोपिनाथपूर हे गाव. तिथे ते साध्या कुडाच्या भिंती असलेल्या साध्याशा घरात राहतात.

सारंगी अविवाहित असून या घरात धाकटी बहीण बिलासिनी पांडा आणि तिचा पती मनोरंजन पांडा सारंगी यांच्यासमवेत राहतात. नानांनी म्हणजे आपल्या मोठ्या भावाने दोनदा आमदार होऊनसुद्धा राहणीमानात आणि घरात काही बदल केले नाहीत. आता केंद्रात मंत्रिपद मिळाल्यावरसुद्धा घर बदलेल असे वाटत नाही, असं त्यांची त्यांची धाकटी बहीण बिलासिनी पांडा सांगतात.

केंद्रीय मंत्री म्हणू प्रदीपचंद्र सारंगी यांनी शपथ घेतल्यानंतर ओडिशाचे मोदी हे सोशल मीडियावर ट्रेंडिंग झाले. या सर्वांत गरीब खासदाराचे घर बघायला निलगिरीजवळच्या त्यांच्या छोट्याशा घराबाहेर तीर्थक्षेत्राला असतात तशा लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. प्रतापचंद्र सारंगी भाजपच्या तिकीटावर ओडिशातील बालशोर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. बीजेडीच्या रविंद्र कुमार जेना यांना त्यांनी 12,956 मतांनी हरवले. त्यांना 2014मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, 2019मध्ये मात्र त्यांनी विजय मिळवला.

प्रतापचंद्र सारंगी यांच्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ओडिशाचे मोदी म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. त्यांनी लग्न देखील केलेले नाही. ते आज देखील झोपडीत राहतात. त्यांची आर्थिक स्थिती अजिबात चांगली नाही. बालसोर येथील गोपीनथपूर येथील गरीब कुटुंबात प्रतापचंद्र सारंगी यांचा जन्म झाला. लहानपणापासून अध्यात्मिक असलेले सारंगी यांनी पदवीपर्यंतच शिक्षण घेतले आहे.

प्रतापचंद्र सारंगी यांना साधू बनायचे होते. ते त्यासाठी रामकृष्ण मठात गेले. पण, मठातील लोकांनी वडील नाहीत तर आधी आईची सेवा करण्याचा सल्ला त्यांना दिला. सारंगी हे सायकलवरून प्रवास करतात. बालासोर आणि मयूरभंज जिल्ह्यातील आदिवासी भागात त्यांनी शाळा बांधल्या आहेत. वैयक्तिक गरजा कमीत कमी ठेवल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या जवळचे म्हणून प्रतापचंद्र सारंगी यांची ओळख आहे. नरेंद्र मोदी ओडिशाला गेल्यानंतर सारंगी यांची भेट घेतात.

Leave a Comment