पाकच्या कर्णधाराने पठाणी सूटवर ब्लेझर घालून करुन घेतले हसू


30 मे पासून इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाल्यानंतर पाकिस्तानला दुसऱ्याच सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, वर्ल्ड कपच्या पहिल्याच दिवसापासून पाकचा कर्णधार चर्चेत आहे.

सर्व कर्णधारांनी वर्ल्ड कप सुरु होण्याआधी बकिंगहम पॅलेसमध्ये महाराणी एलिझाबेथ यांची भेट घेतल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदला त्याने घातलेल्या ड्रेसमुळे ट्रोल करण्यात आले. सर्व कर्णधारांनी महाराणी एलिझाबेथ यांना भेटताना शर्ट-पॅन्ट आणि सूट परिधान केला होता. पण सलवार कमीज पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने घातले होती. त्यावर त्याने ब्लेझर घातले होते.

सोशल मीडियातून ट्रोलर्सनी सर्फराजच्या या वेगळेपणावर जोरदार हल्लाबोल केला. एका मुलाखतीवेळी यावर सर्फराजने उत्तर दिले. सर्फराज म्हणाला की, मी घातलेला पोषाख हा राष्ट्रीय पोषाख आहे. मला बोर्डाने आदेश दिले होते की राष्ट्रीय पोषाखाला प्रमोट करा. एक कर्णधार म्हणून मला गर्व आहे की मी एकट्यानेच राष्ट्रीय पोषाख घातला असल्याचेही सर्फराजने सांगितले.

Leave a Comment