चर्चा करण्यात अयशस्वी झाले म्हणून किम जोंगने 4 अधिकाऱ्यांना घातल्या गोळ्या


नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची चर्चा निष्फळ ठरल्याने उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष अर्थात हुकुमशहा किम जोंग उनने आपला विशेष दूत किम हयोक चोल यांच्यासह 4 अधिकाऱ्यांना गोळ्या घातल्या आहेत. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध सुधारण्याची जबाबदारी किम हयोक यांच्यावर होती. अमेरिकासोबत संबंध सुधारण्यासाठी किम हयोक चोलला नॉर्थ कोरियाने विशेष राजदूत बनवले होते. त्यांच्यावर बैठकीचे आयोजन करण्याची जबाबदारी होती.

याबाबत इतर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या अधिकाऱ्यांवर किम जोंग उनने विश्वासघाताचा आरोप करत मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यानंतर किम हयोक चोल यांच्यासह मिरिम एअरपोर्टवर परराष्ट्र मंत्रालयाच्या 4 अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या. इतर चार जणांची नावे जाहीर करण्यात आलेली नाही. रिपोर्टवर प्रतिक्रिया देण्यास दक्षिण कोरियाईचे मंत्रालयाने नकार दिला आहे.

Leave a Comment