फिलिपिन्सच्या अध्यक्षांनी पाच महिलांचे स्टेजवर घेतले चुंबन


टोकियो – आणखी एक नवीन प्रताप सतत वादाच्या भोवऱ्यात राहणारे फिलिपाईन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुर्तेते यांनी करून ठेवला आहे. त्यांनी जपान दौऱ्यावर असताना एकाच वेळी ५ महिलांना मंचावर बोलावून त्यांचे चुंबन घेतले. मी समलैंगिक होण्यापासून सुंदर महिलांमुळेच बचावलो, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. त्यांना समाज माध्यमांवर त्यावरून प्रचंड ट्रोल केले जात आहे.

सध्या जपानच्या दौऱ्यावर रोड्रिगो दुर्तेते हे आहेत. एका कार्यक्रमाचे जपानच्या टोकीयो शहरात आयोजन करण्यात आले होते. दुर्तेते यांनी यावेळी स्थानिकांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी अचानक काही महिलांना मंचावर बोलावून घेतले व चुंबन घेण्यास सांगितले. त्यामुळे या महिला अचंबित झाल्या. त्यापैकी पहिल्या महिलेने ओठावर की गालावर? असा प्रश्न विचारला असता, ओठांवर बोट ठेवत त्यांनी खुनावले. त्यांनुसार या महिलांनी त्यांचे चुंबन घेतले.

या सर्व महिलांनी आनंदात या ७४ वर्षीय राष्ट्रपतींचे चुंबन घेतले. यावेळी एका महिलेच्या डोळ्यातून चक्क अश्रू आल्याचे दिसले. एका महिलेने चुंबन घेत असताना सेल्फीही खेचला. त्या सर्व महिलांनी दुर्तेते यांचे आभार मानले. फिलिपाईन्स सरकारमधील एक नेते सेनेतोर अँटिनियो यांनी दुर्तेते यांना समलैंगिक असल्याची टीका केली होती. अँटिनोयो यांना फटकारत दुर्तेते यांनी सांगितले की, या सुंदर महिलांमुळेच मी संमलैंगिक होण्यापासून बचावलो.

मात्र, त्यांच्यावर त्यांच्या या वक्तव्यामुळे टीका केली जात आहे. आपल्या सार्वजनिक ठिकाणी अशा वागण्याने मात्र दुर्तेते हे चांगलेच ट्रोल होत आहे. २०१८ साली फिलिपीनो समुदयाच्या एका बैठकीदरम्यानही त्यांनी अचानक एका महिलेचे चुंबन घेतले होते.

Leave a Comment