आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले केएल राहुलशी


बी-टाऊनमधील सेलिब्रेटींसोबतच क्रिकेटपटूंच्या अफेअर बाबत जाणून घेण्यात आपल्यापैकी अनेकजणांना उत्सुकता असते. त्यात क्रिकेट आणि सिनेसृष्टीचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध आपल्या सगळ्यांनाच चांगल्या प्रकारे माहित आहे. काही अभिनेत्रींनी प्रसिद्ध क्रिकेटपटूंशी लग्न देखील केले. काहींचे संसार दूरवर चालले तर काहींचे अर्ध्यावरच मोडले. त्यातच आता आणखी एका भारतीय क्रिकेटपटूच्या अफेअरची चर्चा सध्या जोर धरत आहे. तो म्हणजे टीम इंडियाचा मधल्या फळीतला फलंदाज केएल राहुल. त्याचे नाव याआधी अनेक तरुणींसोबत जोडले गेले.

बॉलीवूड अभिनेत्री सोनल चौहानला केएल राहुल हा डेट करत असल्याची चर्चा आहे. अभिनेत्री सोनल चौहानने यावर स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे. केएल राहुलसोबत अफेअर असल्याचे तिने फेटाळून लावले आहे. सोनल चौहान म्हणाली की, केएल राहुल एक चांगला क्रिकेटपटू आहे. तो टॅलेंटेड असून चांगला माणूस आहे. त्याच्यासोबत अफेअर नसल्याचे तिने स्पष्ट केले. केएल राहुलचे सोनलच्या आधी नाव आलिया भट्टची मैत्रीण आकांक्षा रंजन कपूर हिच्याशी जोडले होते. दोघांचा एकत्र फोटोही व्हायरल झाला होता. त्याचे नाव दोघींच्या आधी मुन्ना मायकल चित्रपटातील अभिनेत्री निधि अग्रवाल हिच्याशी जोडलं होते. हे वृत्त निधिने सुद्धा फेटाळून लावले होते. सोनल आणि केएल राहुल यांच्या डेटची चर्चा आता होत आहे. सोनल हिंदीशिवाय तामिळ आणि तेलगु चित्रपटातही दिसली होती. तिने जन्नत मधून पदार्पण केले होते.

Leave a Comment