छोट्या व्यावसायिकांसाठी नरेंद्र मोदींकडून गुड न्यूज… !


नवी दिल्ली – केंद्रातील सत्ता काबिज केल्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत छोट्या व्यावसायिकांसाठी नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. मोदींनी घेतलेल्या निर्णयानुसार, वयाची ६० वर्षे छोटे दुकानदार आणि छोट्या व्यावसायिकांची पूर्ण झाल्यानंतर त्यांना दर माह ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना माहिती आणि सुचना प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, सर्वांना यामुळे भविष्याबाबत सुरक्षेची हमी मिळणार आहे. सर्व दुकानदार, छोटे व्यावसायिक आणि स्वयंसेवी व्यक्तींना नवीन योजनेनुसार वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिन्याला ३ हजार पेन्शन मिळणार आहे. ५ कोटी लोकांना येणाऱ्या ३ वर्षात याचा फायदा होणार आहे.

१ कोटी ५० लाखांपेक्षा कमी ज्या व्यावसायिकांचा व्यवहार आहे आणि वय १८ ते ४० वर्षे असणारे छोट्या व्यावसायिक या योजनेसाठी नोंदणी करू शकतात. १८ वर्षे वय असणाऱ्या व्यक्तींना यासाठी प्रतिमहिना २ रुपये, २९ वर्षांपूढील व्यक्तींना प्रतिमहिना १०० रुपये आणि ४० वर्षांपूढील व्यक्तीना प्रतिमहिना २०० रुपये जमा करावे लागणार आहेत.

Leave a Comment