टोलनाका टाळण्यासाठी ‘अमेझॉन’वर खरेदी करा ‘फास्टॅग’


नवी दिल्ली : आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन कोणत्याही अडथळ्याशिवाय वाहतूक करण्यासाठी आणि डिजिटल टोल व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे आले आहे. आता तुम्हाला अमेझॉनवरही टोलनाक्यावर वापरले जाणारे ‘फास्टॅग’ खरेदी करता येणार आहेत. तुम्ही हे ‘फास्टॅग’ रिचार्ज करू शकता. टोल नाक्यांवर टोल या माध्यमातून आपोआप भरला जाईल. चार चाकी गाड्यांसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण फास्टॅग ऑनलाईन उपलब्ध आहेत. फास्टॅग यापुढे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवरही उपलब्ध राहतील. ऑनलाईन एनएचआय फास्टॅग स्वयं कार्य करण्याच्या (डू इट युअरसेल्फ) कल्पनेच्या आधारावर तयार करण्यात आले आहे.

उपभोक्ता आणि वाहनाची विस्तृत माहिती ‘माय फास्टॅग’ या मोबाईल अॅपमध्ये देऊन फास्टॅग सक्रीय केला जातो. यानंतर उपभोक्त्यांना आपल्या बँकेच्या खात्याशी हे टॅग जोडावे लागतील. सध्या, सात बँकांद्वारे फास्टॅग बँक खात्याशी जोडण्याची सुविधा देण्यात आली आहे. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, पेटीएम पेमेटस् बँक आणि इक्विटास स्मॉल फायनान्शिअल बँक यांचा यामध्ये समावेश आहे. जानेवारी २०१९ मध्ये ‘एनएचएआय’द्वारे भारतीय राजमार्ग प्रबंधन कंपनी लिमिटेडने फास्टॅग सादर केले होते. फास्टॅगसाठी राजमार्ग प्राधिकरणाने कोणत्याही बँकेला निवडलेले नाही. ‘माय फास्टॅग’ हे मोबाईल ऍप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

Leave a Comment