ही इलेक्ट्रीक स्कूटी खरेदी करण्यासाठी मिळणार 18 हजारांचे अनुदान


मुंबई : हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal इंजिनिअरिंग क्षेत्रातील मोठी कंपनी ग्रेव्हज कॉटनने लाँच केली. 18 हजारांचे अनुदान ही स्कुटी खरेदी करण्यासाठी मिळणार आहे. 18 हजार रुपयांचे अनुदान फेम-2 योजनेअंतर्गत या स्कुटीवर मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केल्यामुळे भारतीयांसाठी ही स्कुटी एक परवडणारा पर्याय ठरु शकते. या स्कुटीची किंमत अनुदानानंतर 66 हजार रुपये असेल.

55 किलोमीटर प्रती तास Ampere Zeal चा टॉप स्पीड आहे. ही इलेक्ट्रिक स्कुटी एकदा फूल चार्ज केल्यानंतर 75 किलोमीटरपर्यंत धावू शकते. साडे पाच तासांचा वेळ या स्कुटीला फुल चार्ज करण्यासाठी लागतो. या स्कुटीचे बॉडी ग्राफिक्स आणि एलईडी हेडलाईट्स याच्या लूकला आधिक आकर्षक बनवतात.

ड्यूअल स्पीड मोड (इकॉनमी आणि पावर) Ampere Zeal इलेक्ट्रिक स्कुटीमध्ये देण्यात आले आहेत. पावरफूल एक्सलरेशन यामध्ये आहे. 14 सेकंदात ही स्कुटी 0 ते 50 किलोमीटर प्रती तासाचा वेग घेऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. या स्कुटीमध्ये अॅण्टी थेफ्ट अलार्मही देण्यात आला आहे. ही स्कुटी पाच कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

Ampere Vehicle ने Ampere Zeal या स्कुटीला बनवले आहे. ही ग्रेव्हज कॉटनची सहाय्यक कंपनी आहे. या कंपनीच्या कमी स्पीड आणि कमी किमतीतील स्कुटीही उपलब्ध आहेत. Ampere Vehicle चे इलेक्ट्रिक व्हेहिकल्स हे तीन वर्षांच्या वॉरंटीसोबत येतात. 300 पेक्षा अधिक रिटेल स्टोर्स आणि 5 हजारपेक्षा अधिक आऊटलेट ग्रेव्हज कंपनीचे या देशात आहेत.

Leave a Comment