देशातील या ठिकाणी उभारली जाणार भगवान शंकराची सर्वात उंच मुर्ती


आपल्या देशात आपण भगवान शंकराच्या विविध आकारच्या आणि उंचीच्या मुर्त्या पाहिल्या असतील. पण आपल्या देशातील या ठिकाणी जगातील सर्वात भगवान शंकराच्या सर्वात उंच इमारत उभारली जाणार आहे. या मुर्तीचे काम शेवटच्या टप्प्यात असून राजस्थानच्या नाथद्वारमधील गणेश टेकडीवर ही मूर्ती साकारली जात आहे. त्याचबरोबर यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात या मूर्तिचे काम पुर्ण होण्याची शक्यता आहे.

याबाबत इतर माध्यमांमध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार मूर्तीचा चेहरा रंगवला गेला असून सध्या हात, पाय आणि छातीवर वेगाने काम सुरू आहे. ३५१ फूटाची ही मूर्ती आहे. तर या मूर्तीला बघण्यासाठी २० फूटावर, ११० फूटावर आणि २७० फूटावर अशा तीन गॅलरी करण्यात आल्या आहेत. या गॅलरी लिफ्टशी जोडल्या गेल्या आहे.

या मूर्तीचा आधार हा ११० फूट खोल आहे. तर पंजे ६५ फूट सांगितले जात आहेत. पंजांपासून ते टोंगळ्यांपर्यंतची उंची १५० फूट आहे. तर खांदे २६० व कमरबंद १७५ फूट उंचीवर आहे. त्रिशूलची लांबी ३१५ फूट आहे आणि केसांचा अंबाडा १६ उंच आहे. २७५ फूटावर भगवान शिवाचा चेहरा आहे. चेहरा ६० फूट लांब आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी २ हजार २०० टनांपेक्षा अधिक स्टील वापरण्यात आले तर या परिसरात ३०० फूटात गार्डन तयार करण्यात येणार आहे. २०१२ मध्ये या मूर्तीचे काम सुरू करण्यात आले होते. दरम्यान नेपाळमध्ये याआधी कैलाशनाथ मंदिरात शिवाची मूर्ती १४३ फूटाची आहे. तर कर्नाटकातील मुरूदेश्वर मंदिरात शिवाची मूर्ती १२३ फूटाची आहे. तसेच तामिळनाडूच्या आदियोग मंदिरात ११२ फूटाची मूर्ती आहे.

Leave a Comment