मोदींच्या मंत्रिमंडळातील 90 टक्के मंत्री कोट्याधीश


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाने प्रचंड बहुमताने सत्ता काबिज केली. काल आपल्या मंत्रिमंडळासोबत मोदींनी शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी एकूण 57 मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये 24 कॅबिनेट मंत्री, 9 स्वतंत्र प्रभार आणि 24 राज्यमंत्री बनवण्यात आले आहेत. मोदींच्या या मंत्रिमंडळातील तब्बल 90 टक्के मंत्री हे कोट्याधीश आहेत.

मोदींच्या मंत्रिमंडळात केवळ 5 मंत्री असे आहेत ज्यांच्याकडे एक कोटींपेक्षा कमी संपत्ती आहे. त्याचबरोबर या मंत्रिमंडळात 10 असे मंत्री आहेत त्यांची एकूण संपत्ती 20 केोटींपेक्षा अधिक आहे. पहिल्या मंत्रिमंडळापेक्षा यंदाच्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाची तुलना केली तर, यावेळी कोट्याधीश मंत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2014 मध्ये 4 असे मंत्री होते त्यांच्याकडे एक कोटीपेक्षा कमी संपत्ती होती. तर 13 मंत्री असे होते की त्यांच्याकडे एकूण 20 कोटीपेक्षा अधिक संपत्ती होती.

यंदाच्या मंत्रिमंडळात 21 असे मंत्री आहेत त्यांच्याकडे 5 कोटी पेक्षा कमी संपत्ती आहे. अशा मंत्र्यांची संख्या 2014 मध्ये 24 होती. 14 असे मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत त्यांची संपत्ती 10 कोटींपेक्षा कमी आहे. अशा मंत्र्यांची संख्या 2014 मध्ये 4 होती. असे 7 खासदार मोदी मंत्रिमंडळात आहे त्यांची एकूण संपत्ती 20 कोटींपेक्षा कमी आहे. अशा खासदारांची संख्या 2014 मध्ये 4 होती. अनेकजण हे आकडे पाहून प्रश्न करत आहेत, श्रीमंत लोकांची संख्या सरकारमध्ये कशी वाढत आहे.

Leave a Comment