१६ वर्षीय मुलाचा सलग सहा तास ‘पब्जी’ खेळल्याने मृत्यू


भोपाळ – ‘पब्जी या धोकादायक गेमने मध्य प्रदेशातील नीमच गावातील १६ वर्षीय फुरकानचा बळी घेतला आहे. मृत फुरकान याचे वडील हारून राशिद कुरेशी दिलेल्या माहितीनुसार सलग सहा तासांपासून त्यांचा मुलगा पब्जी खेळत होता. तो मृत्यू अगोदर ब्लास्ट कर, ब्लास्ट कर असे ओरडला होता. यानंतर रूग्णालयातही त्याला नेण्यात आले होते, पण त्यांच्या मेंदूवर अतिदाब आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नसीराबादेतील केंद्रीय विद्यालयाचा इयत्ता बारावीचा फुरकान विद्यार्थी होता.

छोटी बहिण फिजा हिच्या समोर फुरकानचा मृत्यू झाला. आपल्या भावाचा मृत्यू पब्जी खेळल्यानेच झाला असल्याचे म्हणत फिजाने सांगितले की, तो मृत्यू अगोदर अयान तु मला मारलस, मी हारलो. आता तुझ्या बरोबर नाही खेळणार असे जोर जोरात ओरडत होता. तर नीमचचे ह्रदयरोग तज्ञ डॅा. अशोक जैन यांनी याप्रकरणी सांगितले की, असे गेम खेळताना मुल त्यामध्ये पुर्णपणे गुंतुन जातात, त्याच्याशी स्वतःला जोडून घेतात. यानंतर अतिशय भावनावश होऊन ते कार्डिक अरेस्टचे बळी ठरतात. त्यांच्याकडेच फुरकानला आणल्या गेले होते. या धोकादायक खेळापासून मुलांनी दूर रहावे असे आवाहन डॅाक्टरांनी केले आहे.

Leave a Comment