तगड्या पगाराची नोकरी सोडून ‘ती’ बनली पोर्नस्टार


एका २६ वर्षीय तरुणीने डिजिटल मार्केटिंगमध्ये एमबीए केले असून त‍गड्या पगाराची कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरीही मिळवली होती. पण नोकरी सोडून तिने पोर्नस्टार बनणे पसंत केले आहे. न्यूयॉर्कमधील या युवतीचे नाव एलिक्स लिंक आहे.

एका वेबसाइटला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये एलिक्सने आपली ‘स्टोरी’ शेअर केली असून एलिक्सची ही स्टोरी आता व्हायरल होत आहे. एलिक्सने पोर्नस्टार बनण्याआधी सोशल मीडिया कन्सल्टन्सी व पीआर फर्ममध्येही नोकरी केली होती.

एलिक्सने सांगितले, की पोर्नस्टार बनण्याची इच्छा तिच्यात लहान असतानाच जागृत झाली होती. एकदा मी मित्रासोबत प्लेब्वॉय मॅगझीनमध्ये गेले होते. मला ते मॅगझीन मला प्रचंड आवडले. मी त्यात काम करणार्‍या इतर मुली पाहून खूप भारावले होते. आपण देखील त्याच्यासारखे पोर्नस्टार व्हायला हवे, असा निर्धार मी केला होता. पण ज्या शहरात एलिक्स राहाते, पोर्नस्टारकडे तिथे वाइट नजरेने पाहिले जाते.

एलिक्स कॉलेजच्या दिवसात प्रोफेशनल मॉडलिंग करत होती. पण चार-पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ तिचे हे काम चालू शकले नाही. त्यानंतर पीआर फर्ममध्ये असिस्टन्ट म्हणून नोकरी केली. तीही नोकरी तिने सहा महिन्यात सोडली. त्यानंतर सोशल मीडिया मॅनेजर कन्सल्टन्ट म्हणूनही तिने काम केले.

एलिक्सने सांगितले, त्याचदरम्यान मी प्रचंड फस्ट्रेशनमध्ये होते. यादरम्यान मी कॅम-गर्ल साइट्सवर अकाउंट क्रिएट केले. एलिक्सला वेबकॅमवर तीन तासांसाठी २८७ पाउंड ( जवळपास 28,000 रुपये) मिळाले होते. त्यानंतर एलिक्स आता फुल टाइम प्रोफेशन पोर्नस्टार बनली आहे.

Leave a Comment