या अभिनेत्यांचे हरविले चक्क ‘ऑस्कर’

oscar
अभिनेत्यांसाठी किंवा चित्रसृष्टीमध्ये कार्यरत असणाऱ्यांसाठी ‘ऑस्कर’ सारखा सम्मान प्राप्त होणे ही फार मोठी, प्रतिष्ठेची बाब समजली जाते. काही अभिनेत्यांना हा सम्मान प्राप्त झाला असून, त्यांच्या अंगी अभिनयाचे उत्तम कौशल्य असल्याचे हे प्रशस्तीपत्रक असले, तरी इतका मोठा सम्मान दर्शविणारी ‘ऑस्कर’ ट्रॉफी सांभाळून ठेवण्याच्या कौशल्यामध्ये मात्र हे कलाकार अंमळ कमीच पडले. हॉलीवूडमधील प्रथितयश अभिनेत्री अँजेलीना जोली हिला ‘गर्ल, इंटरप्टेड’ या चित्रपटातील तिने केलेल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री म्हणून ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा सम्मान स्वीकारत ही ट्रॉफी अँजेलीनाने आपल्या आईच्या हाती दिली. अँजेलीनाच्या आईच्या मृत्युनंतर जेव्हा त्यांचे सर्व सामान हलविले गेले तेव्हा ही ऑस्कर ट्रॉफी मात्र गायब असल्याचे आढळले. ती ट्रॉफी नेमकी कुठे असावी याची आपल्याला तिळमात्र कल्पना नसल्याचे अँजेलीना म्हणते.
oscar1
२००२ साली प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग हिला ‘घोस्ट’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री म्हणून ऑस्कर मिळाले. ही ट्रॉफी तिने काही काळानंतर सफाई आणि पॉलीशिंग करून घेण्यासाठी परत पाठविली असता, ‘अकॅडमी’ कडून ही ट्रॉफी पुढे शिकागोमधील आर एस ओवेन्स या कंपनीकडे पाठविली गेली. या कंपनीकडून सफाई आणि प़ॉलीशिंग केले गेल्यानंतर त्यांनी ही ट्रॉफी व्यवस्थित पॅक करून पाठविली असता, व्हूपीला काही दिवसांनी केवळ रिकामा बॉक्सच मिळाला असून, त्यामध्ये असलेली ट्रॉफी कोणीतरी काढून घेतल्याचे निदर्शनाला आले. त्यानंतर अनेक दिवसांनी एका कचऱ्याच्या ढिगात ही ट्रॉफी सापडली असून, ही ट्रॉफी ‘अकॅडमी’ कडे परत पाठविली गेली. अकॅडमीने ही ट्रॉफी त्याची सफाई न करताच व्हूपीकडे परत पाठवून दिली. या घटनेनंतर मात्र ही ट्रॉफी पुहा घराबाहेर न धाडण्याचा ठाम निश्चय व्हूपीने केला असल्याचे समजते.
oscar2
हॉलीवूड अभिनेते मार्लोन ब्रान्डो यांना ऑस्कर पुरस्काराने अनेकदा सम्मानित करण्यात आले आहे. यातील एक ऑस्कर ट्रॉफी त्यांच्या घरातून कधी गायब झाली हे त्यांना समजलेच नसल्याचे ते आपल्या आत्मकथेमध्ये लिहितात. जेव्हा आणखी एकदा मार्लोन यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला तेव्हा तो स्वीकारण्यासाठी मार्लोन स्वतः जाऊ शकले नव्हते. त्यामुळे आपल्या जागी सॅचीन लिटलफेदर यांना आपले स्वीकारण्याबद्दल त्यांनी सांगितले होते. त्यानंतर ही ट्रॉफी अकॅडमी तर्फे मार्लोन यांना पाठविली गेली असल्याची सूचना ही त्यांच्यापर्यंत पोहोचली, पण प्रत्यक्षात मात्र ही ट्रॉफी मार्लोन यांच्यापर्यंत पोहोचू शकली नव्हती.