लवकरच बाजारात येणार ‘टिक टॉक’चा स्मार्टफोन


मुंबई : ‘टिक टॉक’ अॅप भारतात गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहे. मोठ्या प्रमाणावर चीनच्या ByteDance या कंपनीच्या मालकीचे असलेले टिक टॉक अॅप लोकप्रिय झाल्यानंतर आता मोबाईल फोन निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. टिक टॉकचा फोन लवकरच बाजारात येणार असून शाओमी, विवो, ओपो या कंपन्यांच्या फोनला टक्कर देणार आहे.

मोठ्या प्रमाणावर चीनच्या ByteDance या कंपनीची मालकी असलेल्या टिक टॉक अॅपची क्रेझ आहे. कंपनीने गेल्यावर्षी ‘म्युजिकली’ हे अॅप विकत घेतल्यानंतर भारतातील टिक टॉकचे युजर्स मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. ही कंपनी आता मोबाईल फोन निर्मिती करणार असल्याची माहिती मिळत आहे. टिक टॉक अॅपसह ByteDance कंपनीचे इतर अॅप या फोनमध्ये प्रिलोडेड असणार आहेत. या फोनची किंमत टिक टॉक अॅप वापरणाऱ्या बहुतांश लोकांचा विचार करुन ठरवण्यात येणार आहे. पण कंपनीकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

ByteDance या कंपनीला सामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत फोन उपलब्ध करुन देताना सध्या बाजारात असलेल्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. भारतातील स्मार्टफोनच्या बाजारात सध्या असलेल्या कंपन्यांना टिक टॉकचा हा नवा फोन टक्कर देणार आहे.

Leave a Comment