‘या’ 5 कलाकारांनी तगड्या मानधनसाठी नाकारले चित्रपट


तारखांमुळे आणि स्क्रीप्ट न आवडल्यामुळे आतापर्यंत अनेकांनी चित्रपटांना नकार दिला. पण आम्ही आज तुम्हाला ज्या पाच कलाकारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी मनासारखे मानधन दिले नाही म्हणून चित्रपट नाकारले.

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचे नाव या यादीत सर्वात पहिले येते. सोनाक्षीला दबंगच्या यशानंतर किक चित्रपटात काम करण्याची संधी मिळत होती. पण चित्रपटासाठी तिने मानधन जास्त मागितल्यानंतर निर्माते साजिद नाडियाडवालाने सोनाक्षीऐवजी जॅकलीन फर्नांडिसची निवड केली.

बॉलिवूडचा बादशहा शाहरुखचे नाव यात नाही घेतले तर कसे चालेल. स्टारचे स्टारडम ज्या पद्धतीने असते त्यानुसारच त्यांचे मानधन ठरते. शाहरुखला संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या चित्रपटासाठी विचारणा झाली होती. पण जास्त मानधन शाहरुखने मागितल्यामुळे संजय यांना अखेर शाहरुखला नकार द्यावा लागला होता.

एका चित्रपटांसाठी ८० च्या दशकापासून आजपर्यंत चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारी बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितनेही तगडे मानधन मागितले होते. पण निर्मात्यांनी तेवढे देण्यास नकार दिल्यामुळे माधुरीने चित्रपटांना नकार दिला होता.

नवाजुद्दीन सिद्दीकीला जॉली एलएलबी २ चित्रपटासाठी सुरुवातीला विचारण्यात आले होते. पण आपले मानधन त्याने वाढवून सांगितल्यामुळे निर्मात्यांनी त्याला न घेण्याचा निर्णय घेतला.

या यादीत आर. माधवनचे नावही आहे. ऐश्वर्या रायच्या फन्ने खां चित्रपटासाठी अपोझिट सुरुवातीला त्याच्या नावाची विचारणा झाली होती. पण इतर कलाकारांप्रमाणे माधवननेही मानधन वाढवून मागितल्यामुळे त्याच्याऐवजी राजकुमार रावचा विचार करण्यात आला.

Leave a Comment