‘या’ दिवशी रिलीज होणार तापसीच्या ‘गेम ओव्हर’चा ट्रेलर


काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री तापसी पन्नूच्या आगामी ‘गेम ओव्हर’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली. एका तेलुगू चित्रपटाचा ‘गेम ओव्हर’ हा चित्रपट हिंदी रिमेक असणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरच्या रिलीजची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे.

चित्रपटाचा हिंदी ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे चित्रपट व्यापार विश्लेषकांनी ट्विट करून सांगितले आहे. येत्या १४ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असल्याचे टीझरवरून लक्षात येते. हिंदी, तामिळ आणि तेलुगू, अशा तीन भाषांत ‘गेम ओव्हर’ चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विन सारावनन यांनी केले आहे. तर अनुराग कश्यप यांची निर्मिती आहे. ‘बदला’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर तापसीच्या या चित्रपटाचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Comment