
‘सैराट’ चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली ‘आर्ची’ अर्थीत रिंकू राजगुरू ही बारावीच्या परिक्षेत तब्बल ८२ टक्के गुण मिळवून पास झाली आहे. सध्या तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
बारावीच्या परिक्षेत पास झाली रे ‘आर्ची’…..
‘सैराट’ चित्रपटात बारावीत असणाऱ्या आर्चीला ५५ ‘टक्के’ गुण मिळाले होते. पण खऱ्या आयुष्यात रिंकूने बारावीला ८२ टक्के गुण मिळवले आहेत. अलिकडेच ‘कागर’ चित्रपटातून रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिची या चित्रपटात राजकीय भूमिका पाहायला मिळाली. तिला या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच बारावीचा अभ्यास करावा लागला होता. ती अभिनय आणि अभ्यासाची सांगड घालत बारावीत चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झाली आहे.
दरम्यान पुन्हा एकदा ‘मेकअप’ या चित्रपटातून रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात झाला होता. या चित्रपटातही बिनधास्त भूमिका साकारणारी रिंकू रावडी अंदाजात पाहायला मिळणार आहे. आता तिने बारावीचा गड तर जिंकला असल्यामुळे अभिनयात तिला आणखी कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
