१८०० कोटी डॉलरचे दान करणार जेफची बेझोसची पत्नी


न्यूयॉर्क – पत्नी मॅककेन्झी बेझोसला अॅमेझॉनचा संस्थापक जेफ बेझोसकडून देण्यात येणार घटस्फोट जगभरात चर्चेचा विषय झाला. मॅककेन्झी यांना या घटस्फोटानंतर पतीकडून मोठी रक्कम मिळणार आहे. यातील निम्मी रक्कम म्हणजे १ लाख २६ हजार कोटींचे दान करणार असल्याचा निर्णय मॅककेन्झी यांनी जाहीर केला आहे. त्यांनी त्यासाठी प्रतिज्ञा घेतल्याचेही जाहीर केले आहे.

मॅककेन्झी यांचा सामाजिक कार्याला दान केल्यानंतर जगातील सर्वात दानशूर व्यक्तींच्या यादीत समावेश होणार आहे. २०१० मध्ये वॉरेन बफेट यांनी सेवाभावी संस्थेची स्थापना केली. चीन, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिराती आणि इंग्लंडच्या देशातील अब्जाधीशांह बिल गेट्स यांनी या संस्थेला दान दिले आहे. मॅककेन्झी यांनी या संस्थेला दान करण्याच्या प्रतिज्ञेत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.

मॅककेन्झी यांची संपत्ती ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या जेफने घटस्फोट दिल्यानंतर ३६00 कोटी डॉलर एवढी होणार आहे. अब्जाधीशांच्या यादीत अद्याप फोर्ब्सने त्यांचा समावेश केला नाही. घटस्फोटानंतर त्या जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला ठरणार आहेत. आयुष्यात जी काही मालमत्ता मिळाली, त्याने आयुष्याचे पोषण केल्याचे मॅककेन्झी यांनी म्हटले आहे. माझ्याकडे वाटण्यासाठी भरपूर संपत्ती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment