काय होते चित्रपटात कलाकारांनी वापरलेल्या कपड्यांचे?


आपआपल्या स्टाईलमुळे बी-टाऊनमधील प्रत्येक कलाकार ओळखला जातो. त्यांनी घातलेल्या कपड्यांची त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील कमालीची क्रेझ असते. त्यातच त्यांनी एकदा घातलेले कपडे पुन्हा वापरले जात नाही. त्यातच आपल्या वेगळ्या आणि आकर्षक अशा ड्रेसिंग सेन्ससाठी करिना कपूर, दीपिका पादुकोण, सोनम कपूर, आलिया भट्ट या काही अशा बॉलिवूड अभिनेत्री ओळखल्या जातात. त्याचबरोबर करिना कपूर ही तिच्या चित्रपटांमध्येही नेहमी स्टायलिश दिसण्याच्या प्रयत्नात असते. करिना कपूरने ‘हीरोईन’ या चित्रपटात 130 ड्रेस घालण्याचा एक एनोखा रेकॉर्डही बनवला आहे. तर ‘देवदास’ या चित्रपटात धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने 30 किलोचा लेहंगा घातला होता. अलिकडे आलेल्या ‘पद्मावत’ या चित्रपटात दीपिकानेही 30 किलोचा लेहंगा घातला होता.

जे कपडे बॉलिवूड चित्रपटांमध्ये कलाकार घालतात ते फॅशन होऊन जाते. लोकही त्यांचे बघून तसेच कपडे घालतात. तीच फॅशन फॉलो करतात. पण अभिनेत्री, अभिनेते जे कपडे चित्रपटांमध्ये घालतात त्याचे नंतर काय होते, याचा कधी विचार देखील तुम्ही केला नसेल, तर आज आम्ही तुम्हाला या फॅशनेबल, भारी कपड्यांचे चित्रपटानंतर काय होते ते सांगणार आहोत.

चित्रपटांमध्ये घातल्या जाणाऱ्या या कपड्यांचा अनेकदा लिलाव केला जातो. यातून मिळालेले पैसे हे दान केले जातात. माधुरी दीक्षितने ‘देवदास’ चित्रपटात घातलेला हिरव्या रंगाचा लेहंगा 3 कोटी रुपयांमध्ये विकला गेला होता.

असे कपडे अनेकदा अभिनेत्री, अभिनेत्यांचे चाहते विकत घेतात. देशात बॉलिवूड कलाकारांच्या चाहत्यांची काही कमी नाही. आपल्या आवडत्या अभिनेत्री, अभिनेत्यांनी वापरलेल्या वस्तू मिळवण्यासाठी चाहते लाखो-करोडो रुपये खर्च करण्यासाठी तयार असतात. ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटाच्या एका गाण्यात सलमानने वापलेला टॉवेल सलमान खानच्या एका चाहत्याने दीड लाख रुपयांमध्ये विकत घेतला होता.

चित्रपटात काम करणारे कलाकारच या कपड्यांना अनेकदा एक आठवण म्हणून ठेवून घेतात. चित्रपट निर्मातेही अगदी आनंदात त्यांना ते कपडे देतात. पण त्यांना हे कपडे आवडत असले तरी ते नेहमी हे कपडे घालत नाहीत, तर एक आठवण म्हणून या कपड्यांना जपून ठेवतात.

चित्रपटात वापरलेल्या प्रत्येक कपड्याचा लिलाव होईलच असे नसल्यामुळे त्यामुळे लिलाव न झालेले कपडे हे एका पेटीत बंद करुन ठेवले जातात. त्या चित्रपटाचे नाव त्या पेटीवर लिहून प्रोडक्शन हाऊसमध्ये ते ठेवले जातात. या कपड्यांना त्यानंतर इतर चित्रपटांमध्ये मिक्स मॅच करुन ज्युनिअर कलाकारांना घातले जातात. जेणेकरुन त्यांचा वापर व्हावा.

Leave a Comment