दिया मिर्झाच्या वेबसीरिज ‘काफिर’चा ट्रेलर प्रदर्शित


सध्या वेबसीरिजच्या माध्यमातून सिनेविश्वातील अनेक कलाकार प्रेक्षकांसमोर येत आहेत. अनेकजण झी५ वरील ‘काफिर’ या सीरिजची आतुरतेने वाट बघत असून नुकताच या सीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अभिनेत्री दिया मिर्झा ’काफिर’मधून वेबसीरिज विश्वात पदार्पण करत आहे. मोहित रैना सुद्धा या सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजमध्ये एका दहशतवादी आरोपीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकार-वकिलाचा प्रवास दिसत आहे.

ट्रेलरमध्ये असे दिसून येते की, दहशतवादाचे आरोप दियावर करण्यात आले आहेत व अनेक वर्ष ती तुरुंगात आहे. या ट्रेलरमध्ये दियाची एक लहान मुलगीसुद्धा दिसत आहे. एक पत्रकाराची व्यक्तिरेखा मोहित रैनाने साकारली आहे. वकीलीचेही शिक्षण त्याने घेतले आहे. तो दिया मिर्झाला न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा वकीली पेशा स्वीकारतो असे दिसते.

सोनम नायर यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले असून लेखन भवानी अय्यर यांनी केले आहे. ही कथा सत्य घटनांवर आधारित आहे. वेबसिरीजबद्दल बोलताना दियाने सांगितले की, इतकेच मी सांगू शकते की ही कथा सत्य घटनांवर आधारित आहे. लोकांपर्यंत ही कथा पोहोचवणे गरजेचे आहे. मी आतापर्यंत ऐकलेल्या कथांपैकी ही सगळ्यात सुंदर कथा आहे. ही भूमिका मला साकारत आली हे माझे भाग्य आहे.

Leave a Comment