१ जूनला राधाकृष्ण विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश


मुंबई – १ जून रोजी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करतील, अशी घोषणा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई येथे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा ३० मे रोजी पार पडल्यानंतर विखे-पाटील १ जून रोजी भाजप प्रवेश करणार आहेत.

गिरीश महाजन आणि विखे-पाटील यांची बैठक मुंबई येथील महाजन यांच्या निवासस्थानी झाली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडूण आलेले खासदार सुजय विखे-पाटीलही बैठकीला उपस्थित होते. विखे-पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच २५ एप्रिलला राहुल गांधीकडे राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा राहुल गांधी यांनीही मंजूर केला होता. पुत्र सुजयच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे-पाटील भाजप प्रवेशाच्या बातम्या त्यामुळे येत होत्या. याबाबत विखे-पाटलांनीही वेळोवेळी संकेत दिले होते. गिरीश महाजन यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.

Leave a Comment