‘या’ दिवशी रिलीज होणार वरूण धवनचा ‘स्ट्रिट डान्सर’


अभिनेता वरूण धवन ‘कलंक’ चित्रपटानंतर आता ‘स्ट्रिट डान्सर’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही ठरली आहे. त्याचबरोबर चित्रपटाचे नवे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे.


पुढच्या वर्षी २४ जानेवारीला वरूण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही, अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसुजा करत आहेत. ‘एबीसीडी’ चित्रपटाचा हा तिसरा भाग असल्याने या चित्रपटाबद्दल चाहत्यामध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

या चित्रपटाचे पोस्टर वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांनी देखील सोशल मीडियावर शेअर केले आहे. वरूणच्या हातात या पोस्टरमध्ये तिरंगा पाहायला मिळतो. ‘थ्रीडी’ स्वरूपातही हा चित्रपट पाहता येईल. या चित्रपटाचे पहिले शुटिंग शेड्यूल पूर्ण झाले आहे. आता दुबई येथे या चित्रपटाचे दुसरे शेड्यूल पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी चित्रपटाची टीम दुबईला रवाना झाली आहे.

Leave a Comment