शंभर कोटींच्या घरात ‘दे दे प्यार दे’ची एन्ट्री


‘दे दे प्यार दे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगन प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याच्यासोबत या चित्रपटात तब्बु आणि रकुल प्रित या अभिनेत्री झळकल्या. पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांवर अजय-तब्बु आणि रकुलची केमेस्ट्री छाप पाडत आहे. या चित्रपटाने अलिकडेच कमाईत शंभर कोटीचा आकडा गाठला आहे.

दोन आठवड्यानंतरही सिनेमागृहात ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाची जादु कायम आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने ८६.७६ कोटींची कमाई केली आहे. तर विदेशातील बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने १५ कोटींची कमाई केली आहे.

२४ मे रोजी विवेक ओबेरॉयचा ‘पीएम नरेंद्र मोदी’ आणि अर्जून कपूरचा ‘इंडियाज मोस्ट वान्टेड’ हे चित्रपट या चित्रपटाच्या शर्यतीत उतरले. मात्र, प्रेक्षकांनी या दोन्हीही चित्रपटाकडे पाठ फिरवली. ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाला माऊथ पब्लिसीटीचाही फायदा होताना दिसत आहे. भारतात तब्बल ३१०० स्क्रिन्सवर हा चित्रपट झळकला आहे. प्रेम, भावना, रोमान्सने भरलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईत आणखी भर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment