शरद पवारांची व्यक्तिरेखा साकारायची आहे सुबोधला


अभिनेता सुबोध भावेने आजवर अनेक दिग्गजांच्या भूमिका साकारल्या असून त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका साकारायाची असल्याचे मत व्यक्त केले आहे. आतापर्यंत लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर यांचे बायोपिक सुबोधने केले.

तुमच्या मनात काय चालले आहे हे तुम्हाला काहीच कळू द्यायचे नाही. हे फार अवघड आहे. ५५ वर्ष शरद पवार राजकारणात आहेत. जेवढे त्यांनी बघितले आहे तेवढे राजकारणात आज कोणीच पाहिलेले नाही. चेष्टा म्हणून मी म्हणत नाही, पण सतत सातत्याने व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका करायला मला नक्कीच आवडेल, असे सुबोध म्हणाला. सुबोधने याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीची जेव्हा मुलाखत घेतली होती तो तेव्हा राहुलचा बायोपिक करणार याची चर्चा झाली होती. शिवसेनेच्या चित्रपट सेनेचा सुबोध स्वत: पदाधिकारी आहे.

Leave a Comment