तुमची झोप उडवेल या दोन खरबूजांची किंमत


खरबूज आणि कलिंगड उन्हाळ्यात खाणे अनेकांना आवडते. ते खाण्यासाठी लोक जास्त पैसे देखील मोजतात. कलिंगड किंवा खरबूज साधारणपणे १०० रूपये देऊन खरेदी केले जाते. पण खरबूज प्रेमींची झोपच उडेल अशी बातमी जपानमधून समोर आली आहे. तब्बल ३१.६ लाख रूपयांना जपानमध्ये खरबूजांची जोडी विकली गेली आहे. दरवर्षी जपानमध्ये खरबूजांची बोली लागते, मोठमोठी बोली ज्यात लोक लावतात. अशीच खरबूजांची जोडी गेल्यावर्षी २० लाख रूपयांना विकली गेली होती.

खरबूजांवर जपानच्या युबारीमध्ये बोली लावण्यात आला. एका व्यक्तीने ३१ लाख ६९ हजार ७७० रूपयांना हे दोन खरबूज खरेदी केले. केशरी रंगाचे हे खरबूज फार गोड असते. ही खरबूजाची एक खास प्रजाती असून याला केंटालूप असे नाव आहे. अशा १ हजार खरबूजांवर जपानच्या युबारीमधील थोक मार्केटमध्ये बोली लागली आहे. पण या खरबूजांच्या जोडीने रेकॉर्ड नोंदवला आहे. रिपोर्ट्सनुसार, हे खरबूज सर्वसामान्य लोकांना बघता यावेत म्हणून ते प्रदर्शनात ठेवले जातील. जगभरातील ५१ टक्के केंटालूपची निर्यात चीनकडून केली जाते.

दरवर्षी मे महिन्यात जपानमध्ये वेगवेगळ्या फळांची विक्री होते. यातील काही खास फळे असतात, जपानी लोकांना जे फार आवडतात. ही फळे महागडी विकली जातात. केंटालूप खरबूजही त्यापैकी एक आहे. हे फळ जपानमध्ये हाय क्वालिटी फळ मानले जाते.

Leave a Comment