फोर्ब्स इंडिया मॅगजीनच्या कव्हर पेजवर झळकला हिटमॅन


मुंबई : सध्या प्रत्येक क्रिकेट चाहत्यांचा भारतीय क्रिकेट संघाचा उप कर्णधार रोहित शर्मा आवडता खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माची क्रेझही दिवसेंदिवस क्रिकेट चाहत्यांमध्ये वाढत आहे. रोहित शर्माचा जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत समावेश होतो. रोहित शर्माची एकदिवसीय क्रिकेट सामन्यात तीनवेळा दुहेरी शतक करणारा एकमेव खेळाडू म्हणून ओळख आहे.

आयपीएल क्रिकेट सामन्यात रोहित मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार पदी होता आणि आपल्या नेतृत्वात त्याने मुंबई संघाला चौथ्यांदा जेतेपद मिळवून दिले. रोहितने यापूर्वीही 2013, 2015, 2017 आणि यंदा 2019 मध्येही आपल्या संघाला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले. रोहित चारवेळा आयपीएल जेतेपद मिळवून देणारा एकमेव खेळाडू आहे. फोर्ब्स इंडियाने या सर्व गोष्टींची दखल घेत आपल्या स्पोर्टस आवृत्तीच्या कव्हर पेजवर रोहित शर्माला स्थान दिले आहे.


याबाबत फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, भारताचा उपकर्णधार रोहित शर्माची कव्हर स्टोरी असेल. फोर्ब्सला रोहितने दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या क्रिकेट आणि कर्णधार पदापर्यंतच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. भारतीय संघातील त्याच्या कामगिरीबाबतही त्याने सांगितले आहे. याशिवाय मॅगजीनच्या एका आवृत्तीमध्ये कबड्डी लीग आणि देशात त्याच्या वाढत्या क्रेझवरही लेख छापण्यात आला आहे. तसेच UEFA चॅम्पियन्स लीग आणि युरोप लीगवरही लेख छापण्यात आला आहे.

‘ROHIT HIT HOORAY’ अशी मॅगजीनच्या विशेष आवृत्तीच्या कव्हर स्टोरीची हेडलाईन आहे. सध्या आयसीसी वर्ल्डकपसाठी रोहित शर्मा तयारी करत आहे. दरम्यान, आयपीएल क्रिकेट वर्ल्डकपचे आयोजन 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होत आहे. भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण अफ्रिकेत खेळणार आहे.

Leave a Comment