जुन्या सहकाऱ्यांना पाहताच खासदार झालेल्या पोलीसाने ठोकला सॅल्युट !


हैदराबाद : सध्या सोशल मीडियावर लोकप्रतिनिधींना सलाम करण्यापासून ते स्वतःच खासदार होऊन सलाम स्विकारण्याचा प्रवास करणाऱ्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हा नवनिर्वाचित खासदार आपल्या जुन्या वरिष्ठाना सलाम करताना या फोटोत दिसत आहे.

आंध्रप्रदेशमधील पोलीस निरीक्षक गोरंतला माधव यांचा हा फोटो असून यावेळच्या लोकसभा निवडणुकीत ते अनंतपूर जिल्ह्यातील हिंदापूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. खासदार माधव आणि त्यांचे जुने वरिष्ठ गुन्हे शाखेचे उपाधीक्षक मेहबूब बाशा या फोटोत एकमेकांना पाहून आनंदाने सलाम करताना दिसत आहेत. बाशा यांच्यासोबत यावेळी इतर पोलीसही उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.

वायएसआर काँग्रेसकडून निवडणूक लढवताना माधव यांनी तेलुगू देसम पक्षाचे विद्यमान खासदार क्रिस्तप्पा निम्मला यांचा 1 लाख 40 हजार 748 मतांनी पराभव केला. मतमोजणी सुरु असताना एका मतदान केंद्राच्या बाहेर संबंधित फोटो घेण्यात आला होता. माजी पोलीस अधिकारी आणि नवनिर्वाचित खासदार माधव माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी प्रथम माझ्या जुन्या वरिष्ठांना सलाम केला. त्यांचा मी आदर करतो. तो सलाम आमच्या दोघांमधील परस्पर सामंज्यस्यातून केला होता.

2018 मध्ये हिंसाचारप्रकरणावरुन माधव आणि टीडीपीच्या एका खासदारांमध्ये झालेल्या वादानंतर ते प्रथम चर्चेत आले. पोलिसांना आर्वाच्च आणि गलिच्छ भाषेत बोलताना टीडीपी खासदारांनी टीपण्णी केली. माधव यांनी तेव्हा संबंधित खासदाराला चांगलेच सुनावत असे बोलणाऱ्याची जीभ छाटू असे म्हटले होते. त्यानंतर माधव यांनी पोलीस खात्यातून स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि राजकीय आखाड्यात उडी घेतली.

Leave a Comment