पुरी येथील जगन्नाथ मंदिराला पाकिस्तानी हिंदूंनी दिली भेट


भुवनेश्वर – ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ मंदिराला नुकतीच पाकिस्तानातील हिंदूंच्या ९३ प्रतिनिधींनी भेट दिली. त्यांनी त्याआधी हरिद्वारला भेट दिली. हे हिंदू इस्लामाबाद, कराची, बलुचिस्तान आणि पाकिस्तानातील आणखी ठिकाणांहून आले होते. त्यांच्या कार्यक्रमांची भुवनेश्वर येथील ओंकारनाथ मिशनने भेटीदरम्यानच्या व्यवस्था केली होती.

हा आमच्याकडून जगाला शांततेचा संदेश असल्याचे मिशनचे संस्थापक किंकर विठ्ठल रामानुज महाराजांनी म्हटले आहे. आमच्या भारतभेटीचा विविध हिंदू धार्मिक स्थळांना भेटी देणे हा उद्देश होता. आपापल्या बाजूंना दोन्ही सरकारे शांतता प्रस्थापित करतील, अशी आशा असल्यामुळे दोन्ही देशांतील लोकांना दोन्ही देशांमध्ये प्रवास करता येईल, असे या प्रतिनिधींपैकी साई आत्मा राम यांनी म्हटले आहे. एका महिन्यात विविध धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी आम्हाला व्हिजिट व्हिसा मिळाला आहे. हरिद्वार आणि हृषिकेशला आम्ही गेलो. आता मथुरा आणि वृंदावनला जाणार असल्याचे आणखी एका व्यक्तीने सांगितले.

Leave a Comment