
भटिंडा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आकाशात ढगाळ वातावरण असताना विमान रडारच्या कक्षेत येत नाहीत, असे वक्तव्य केल्यामुळे विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. पण मोदींचा तो दावा खरा असून रडारला ढगाळ वातावरणात लढाऊ विमाने शोधण्यास अडचणी येतात, अशी माहिती हवाई दलाचे कमांडिंग इन चीफ रघुनाथ नांबियार यांनी दिली.
मोदींच्या त्या वक्तव्याला हवाई दलाकडून पुष्टी
पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका मुलाखतीत एअरस्ट्राईक वेळी मी ढगाळ वातावरण असताना हवाई दलाला हल्ला करण्याचा सल्ला दिला होता. शत्रुच्या रडारला जेणेकरून आपली विमाने दिसणार नाहीत. मोदींच्या या दाव्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली गेली. त्यांना विरोधकांनी प्रचंड ट्रोल केले. पण, हवाई दलाच्या आधिकाऱ्यांनीच आता मोदींच्या वक्तव्याचे समर्थन केले. वेगवेगळ्या प्रकारचे रडार असतात. काही रडार हे ढगाळ वातावरणातही विमानांची स्थिती जाणू शकतात. मात्र, काही रडारमध्ये ती क्षमता नसते, असे ते म्हणाले.
मिराज २००० ही विमाने बालाकोट येथे करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकवेळी वापरण्यात आली होती. हा हल्ला रात्रीच्या वेळी करण्यात आला होता. यावेळी केलेल्या हवाई हल्ल्यात २०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याचा दावा सरकारने केला होता.
