…नाहीतर कायमचे बंद होईल व्हॉट्सअॅप


मुंबई : गेल्या काही वर्षांपासून तंत्रज्ञानानेही दैनंदिन जीवनशैलीमध्ये खुप महत्त्वाची जागा गेतली आहे. व्हॉट्सअॅप याच तंत्रज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. या मेसेजिंग अॅपमध्ये जरासा बिघाड झाला तरीही गोष्टी सुधारत नाहीत. अशातच एक चूक करण्यापासून तुम्ही कायम दूर राहा, नाहीतर हेच व्हॉट्सअॅप कायमचे बंद होऊ शकते.

Temporarily banned असा मेसेज व्हॉट्सअॅप वापरतेवेळी तुम्हाला दिसू लागल्यास सावध व्हा. कारण, या अॅपच्या अधिकृत व्हर्जनऐवजी एखादे अनसपोर्टेड व्हर्जन तुम्ही वापरत असल्याचाच हा इशारा असल्यामुळे सपोर्टेड व्हर्जन वापरण्यास लगेचच सुरुवात करा, नाहीतर व्हॉट्सअॅप कायमचे बंद होऊ शकते.

व्हॉट्सअॅप प्लस आणि जीबी व्हॉट्सअॅप हे अनसपोर्टेड व्हर्जन असून व्हॉट्सअॅपची अनधिकृत प्रत आहेत. हे अॅप दुसऱ्याच कोणाकडून डेव्हलप करण्यात आले आहेत. अनेक नियमांचेही ज्यांच्या माध्यमातून उल्लंघनही केले जाते. व्हॉट्सअॅप या अॅपला सपोर्ट करत नाही. ही पावले सुरक्षेच्या दृष्टीने उचलण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅपच्या अधिकृत व्हर्जनचा वापर करण्यासाठी लगेचच चॅट हिस्टरीचा बॅकअप घ्या. तुम्हाला बॅकअप घ्यायचा आहे की नाही, हे तुमच्या मोबाईलमध्ये कोणत्या व्हॉट्सअॅपचे व्हर्जन आहे, यावरुन ठरवले जाईल. मोबाईलमधील अनधिकृत व्हर्जनचे नाव माहिती करुन घेण्यासाठी More Options > Settings > Help > App info पाहा. जर व्हॉट्सअॅप प्लस किंवा जीबी व्हॉट्सअॅप किंवा इतर कोणते अॅप वापरत असाल, तर चॅट बॅकअप घेण्याला प्राधान्य द्या.

Leave a Comment