आज जाहीर होणार बारावीचा निकाल


मुंबई – आज बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर होणार असून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजता हा निकाल पाहायला मिळेल. बारावीची परिक्षा फेब्रुवारी – मार्च महिन्यात घेण्यात आली होती.

तब्बल १४ लाख विद्यार्थ्यांनी यावर्षी बारावीची परिक्षा दिली होती. मंडळाच्या संकेतस्थळावर सर्व विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. गेल्यावर्षी ३० मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता. यात ८८.४१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यात मुलींचे प्रमाण ९२.३६ टक्के तर मुलांचे प्रमाण ८५.२३ टक्के एवढे होते. निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे. २९ मे ते ७ जून या कालावधीत गुणपडताळणी करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २९ मे ते १७ जूनपर्यंत अर्ज करता येईल

या संकेतस्थळावर पाहू शकता निकाल-
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

Leave a Comment