वॉरेन बफे यांच्यासोबत लंच साठी आत्ताच १७ लाखाची बोली


बर्कशायर हाथवेचे सीइओ आणि जगातील चार नंबरचे श्रीमंत वॉरेन बफे यांच्यासोबत लंच घेण्यासाठी बोली सुरु झाली असून ईबेवर रविवारी ही बोली १७ लाख ४० हजार रुपयंवर गेली आहे. ३१ मे ला सायंकाळी ७ वा.३० मिनिटांपर्यंत बोली लावण्याची मुदत असून त्यातून मिळणारी रक्कम सॅन फ्रान्सिस्को येथील ग्लाईड या चॅरीटी संस्थेला दान दिली जाणार आहे. गेली १९ वर्षे या प्रकारे दरवर्षी अशी बोली लावली जात असून त्यातून बफे यांनी या संस्थेला २१० कोटी रुपयांचे सहाय्य मिळवून दिले आहे. बोली जिंकणारी व्यक्ती त्याच्या सात दोस्तांसह बफे याच्यासोबत लंच घेऊ शकणार आहे.

यंदाच्या वर्षी २०१२ साली नोंदविला गेलेला विक्रम मोडला जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यावर्षी बफे याच्यासोबत लंच साठी २४ कोटी रुपयांची बोली लागली होती. या बोलीची सुरवात २००० सालापासून झाली असून वॉरेन बफे या संदर्भात म्हणाले समाजाने बेघर लोकांना वाऱ्यावर सोडले असले तरी ग्लाईड मुळे त्यांना एक संधी नक्कीच मिळणार आहे. ही संस्था गरीब, भुकेकंगाल, बेघर लोकांच्या मदतीसाठी काम करते. संस्थेच्या सीइओ करेन हेनरहान म्हणाल्या, सध्या गरजूंची संख्या खूपच वेगाने वाढत चालली आहे. त्यात बेघर अधिक संख्येने आहेत.
—————

Leave a Comment