तुम्हाला माहित आहे ज्युनिअर एनटीआरचे खरे नाव


टॉलीवूडसाठी ज्युनिअर एनटीआर हे नाव नवीन नाही. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील फार नावाजलेल्या नावांपैकी एक नाव त्याचे असून या मेगासुपरस्टारचा २० मे १९८३ ला जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव नंदमुरी हरिकृष्ण आणि आईचे नाव शालिनी भास्कर राव असून याच मेगास्टारच्या काही माहीत नसलेल्या गोष्टी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

१९९१ मध्ये ब्रह्मश्री विश्वामित्र या चित्रपटात ज्युनिअर एनटीआरने बालकलाकार म्हणून काम केले होते. एनटीआरचे आजोबा एन.टी. रामाराव यांनी त्याच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ज्युनिअर एनटीआरचे खरे नाव तारक आहे हे फार कमी लोकांना हे माहीत आहे.

पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला चाहत्यांनी ज्युनिअर एनटीआर या नावाने हाक मारायला सुरुवात केली. त्याचे नाव तेव्हापासूनच तारक बदलून ज्युनिअर एनटीआर झाले. तसेच फार कमी लोकांना माहीत आहे की, तो एक प्रशिक्षित कुच्चीपुडी डान्सरही आहे.

Leave a Comment