या पाच हॉट कॉमेंट्रेटरही करणार विश्वचषक स्पर्धेचे समालोचन


येत्या 30 तारखेपासून क्रिकेटचा महासंग्राम अर्थात विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार असल्यामुळे जगातील सर्व खेळाडू आपला जलवा या स्पर्धेत दाखवतील. आयपीएलने दोन महिने मनोरंजन केल्यानंतर विश्वचषक आता क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे. भारतीय संघ यात प्रबळ दावेदार असल्यामुळे सामन्यांकडे भारतीयांची ओढ ही जास्त असेल. पण यंदा चाहत्यांचे मनोरंजन फक्त खेळाडूच नव्हेतर या पाच सुंदर कॉमेंट्रेटर देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. त्या कॉमेंट्रेटरबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

आयसीसीकडून इंग्लंडमध्ये रिद्धिमा पाठक क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कव्हर करणार आहे. रिद्धिमा एकमेव भारतीय समालोचक आहे. क्रिकेटच्या आधी बास्केटबॉलचे रिद्धिमाने समालोचन केले आहे. दरम्यान रिद्धिमाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून क्रिडा समालोचन करण्यात तिला जास्त रस आहे.

बांगलादेशची ब्युटी क्विन पेया जन्नतुलही सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. पेयाने बांगलादेशची टी-20 सामन्यांचे समलोचन केले असल्यामुळे तिची क्रिकेटच्या मैदानाबाहेर चर्चा जास्त असते. आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये जन्नतुल बांगलादेश टिव्ही आणि गाजी टिव्ही यांच्यासाठी समालोचन करणार आहे.

सर्वांच्या नजरा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्यात कोण बाजी मारणार याकडे असल्या तरी, सध्या पाकिस्तानची समोलचक जैनेब अब्बास हिची चर्चा आहे. पाकिस्तानकरिता आयसीसी विश्वचषक स्पर्धा जैनेब करणार आहे. जैनेब पाकिस्तानमधली प्रसिध्द क्रिडा समालोचक आहे.

मयंती लँगर हिच्या नावाची भारतातील घराघरात चर्चा असते. क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीची जगातील सर्वात प्रसिध्द अशी ही भारतीय महिला समलोचक पत्नी आहे. मयंती स्टार स्पोर्टससाठी वर्ल्ड कप कव्हर करणार आहे. भारतात मयंतीचे खुप चाहते आहेत.

Leave a Comment