‘या’ दिवशी रिलीज होणार ऋतिकचा ‘सुपर ३०’


बऱ्याच दिवसापासून अभिनेता ऋतिक रोशनच्या ‘सुपर-३०’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. सतत काही ना काही अडथळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेमध्ये येत होते. पण, या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. १२ जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे.


याबाबतची अधिकृत माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिली आहे. ‘जबरिया जोडी’ या चित्रपटाशी ऋतिकच्या ‘सुपर-३०’ चित्रपटाची टक्कर होऊ शकते. या वर्षी जानेवारी महिन्यातच ‘सुपर-३०’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण, कंगनाचा ‘मणिकर्णिका’ चित्रपटासोबत २५ जानेवारीला टक्कर होऊ नये, म्हणून या चित्रपटाची तारीख बदलण्यात आली. त्यानंतर पुन्हा २६ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, यावेळीही कंगना आणि राजकुमार रावचा ‘मेंटल है क्या’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली.

हा चित्रपट आता १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे. पटनाच्या गणीततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात मृणाल ठाकुर, अमीत संध आणि नंदिश संधु हे कलाकारही झळकणार आहेत.

Leave a Comment