‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’मधील अर्जूनचा वेगळेपणा प्रेक्षकांना नाही भावला


शुक्रवारी अर्जून कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अर्जून या चित्रपटाच्या निमित्ताने एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण या चित्रपटातील अर्जूनचा हा वेगळेपणा प्रेक्षकांना फारसा आवडलेला दिसत नाही.

पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीची या चित्रपटाची कमाई समोर आली असून या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ २.१० कोटींची कमाई केली आहे. तर कमाईच्या आकड्यात दुसऱ्या दिवशी काही प्रमाणात वाढ झाली असून ३.३ कोटींची कमाई चित्रपटाने केली आहे. राज कुमार गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर या चित्रपटाची फॉक्स स्टार स्टुडिओज अंतर्गत निर्मिती करण्यात आली आहे.

अनेक निष्पापांचे भारतावर होणाऱ्या हल्ल्यात जाणारे जीव थांबवण्यासाठी ५ लोकांच्या टीमने उचलेले पाऊल आणि सर्वात क्रुर गुन्हेगार ओसामाला पकडण्यासाठी कोणत्याही हत्यारांविना चाललेली या टीमची धडपड, या चित्रपटातून पाहायला मिळते. बॉक्स ऑफिसवर आता हा चित्रपट आणखी किती गल्ला जमवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment