फातिमा सनाने ट्रोलरला चांगलेच झापले


अनेकांच्या टीकांचा सामनाही बॉलिवूड अभिनेत्रींना प्रसिद्धीसोबतच करावा लागतो. ट्रोलर्स विशेषतः सोशल मीडियावर अभिनेत्रींच्या कपड्यांवरून त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाही. आता फातिमा सना शेख हिने अशाच एका ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले आहे.

इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपला एक फोटो फातिमाने शेअर केला होता. एका यूजरने या फोटोवर कमेंट करत तू मुस्लीम आहेस त्यामुळे व्यवस्थित कपडे घालत जा, असा खोचक सल्ला तिला दिला होता. यावर प्रतिक्रिया देत, मी तुला ब्लॉक करत असल्याचे फातिमाने म्हटले आहे.

त्याचबरोबर फातिमा ‘माय बॉडी… माय रूल, युअर गमला…युअर फुल’, असेही म्हणाली. फातिमाची कपड्यांवरून ट्रोल होण्याची ही पहिली वेळ नाही. तिला याआधी अनेकदा ट्रोलर्सच्या कमेंटचा सामना करावा लागला आहे. तिने याबद्दल एका मुलाखतीत बोलताना म्हटले होते, की मी कोणाच्या घाणेरड्या कमेंट का सहन करू, कोणी असे केल्यास मी त्याला सरळ ब्लॉक करते.

Leave a Comment