राष्ट्रपती भवनात ३० तारखेला होणार मोदींचा शपथविधी


नवी दिल्ली – भाजप प्रणित एनडीएने लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर सरकार स्थापनेला वेग आला आहे. नरेंद्र मोदींनी शनिवारी राष्ट्रपतींची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यानुसार, राष्ट्रपती भवन येथे ३० मे रोजी सायंकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी १७ व्या लोकसभेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत यावेळी काही नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

नरेंद्र मोदींची शनिवारी सेंट्रल हॉल येथे एनडीएच्या बैठकीत संसदीय नेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर, नवीन सरकार लवकरच स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर मोदींनी १६ वी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारसही राष्ट्रपतींकडे केली होती. वेळ वाया न घालवता ३० मे रोजीच नवीन सरकार स्थापन करण्याचा निर्णय नरेंद्र मोदींनी घेतला आहे.

भाजपने २३ मे २०१९ रोजी झालेल्या मतमोजणीत ३०३ जागांवर विजय मिळवला होता. तर, भाजपने २०१४ साली २८२ जागा जिंकल्या होत्या. १९७१ सालानंतर प्रथमच काँग्रेस सोडून इतर पक्षाने सलग २ वेळा स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. १९७१ साली जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात बहुमतापेक्षा काँग्रेस खासदारांची जास्त होती.

Leave a Comment