रणजितसिंह नाईक निंबाळकरांची रामराजेंवर अत्यंत खालच्या पातळीवरील टीका


सोलापुर – सोलापुरातील माढा लोकसभा मतदाराचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार होताच वादग्रस्त वक्तव्य करत वाद निर्माण केला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जीभ विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकरांवर यांच्यावर टीका करताना घसरली असून त्यांनी रामराजे यांना बिनलग्नाची औलाद असे म्हटले आहे.

माढ्यातून तब्बल ८५ हजारांच्या मताधिक्याने रणजितसिंह नाईक-निंबाळकर विजयी झाले आहेत. फलटण येथे त्यांच्या विजयानिमित्त विजयी सभेचे आयोजन करण्यात आले होते. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी बोलताना म्हटले की, माझा डीएनए तपासा, ९६ पिढ्या नाईक निंबाळकरच निघतील. पण रामराजे हे बिनलग्नाची औलाद आहेत.

ओरिजनल नाईक-निंबाळकर मी असून माझा डीएनए तपासला तर या रणजितसिंहाच्या ९६ पिढ्या नाईक-निंबाळकरच निघतील. परंतु तुमचे काय? स्वत:ला तुम्ही नाईक-निंबाळकर म्हणवता आणि नाईक-निंबाळकर मी नाही म्हणून सांगता? तुमच्या आईचे आणि वडिलाचे लग्न झाले असेल? मला त्या लग्नाचा दाखला दिला तर त्याला एक हजाराचे बक्षिस देईन, असे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे. एवढ्यावरच रणजितसिंह नाईक निंबाळकर थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले की, रामराजे ही बिनालग्नाची औलाद आहे, हा इतिहास आहे. रामराजेंच्या वडिलांना मालोजीराजेंनी घरात न घेतल्यामुळे मला वाईट बोलायचे नव्हते, परंतु बोलावे लागले आहे.

Leave a Comment