असे आहेत बिग बॉस मराठी २चे नवे पाहुणे


गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठी २ च्या घरात कोण कोण असणार याची लागलेली उत्सुकता संपली असून नुकताच या कार्यक्रमाचा ग्रँड प्रिमिअर पार पडला असून कोणकोणते सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरात जाणार यावरून पडदा उचलण्यात आला आहे. मराठी कलाविश्वातील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच गाजणारा रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन यावेळीदेखील महेश मांजरेकर करणार आहेत

बिग बॉसच्या घरातील पहिली स्पर्धक मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे विज ठरली. ७वा क्रमांक किशोरी शहाणेला मिळाला आहे. या स्पर्धेचा दुसरा स्पर्धक मालवणचे नायक दिगंबर नाईक आणि तिसरी स्पर्धक नेहा शितोळे ठरली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची मिमिक्री दिगंबर नाईक यांनी स्टेजवर करून दाखवली तर अभिनेत्री नेहा शितोळेने कविता सादर केली आहे. घरात एन्ट्री घेण्यापूर्वी दिगंबर नाईकने गाऱ्हाणे घातल्यामुळे तेथेच स्पर्धेला सुरूवात झाली आहे.

नेहा शितोळेनंतर कवी मनाचे नेते म्हणून ओळखले जाणारे अभिजीत बिचुकले यांनी घरात प्रवेश केला. ‘पिंगा गं पोरी पिंगा’ हे गाणे गात महाराष्ट्राची महागायिका वैशाली माडेने जबरदस्त एण्ट्री केली. त्यानंतर ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेची अभिनेत्री वीणा जगतापने ही बिग बॉसच्या घरात पोहोचली. या मालिकेच्या शीर्षकगीतावर तिने परफॉर्म केले.

पहिल्या दिवसांपासूनच बिग बॉसच्या घरात राजकारण सुरू झाल्याचे दिसून आले. दिगंबर नाईकने सुरूवातीला घातलेल्या गाऱ्हाण्यानंतर माझ्या मुलीची मला प्रचंड आठवण येईल असे म्हणत वैशालीने सर्वांना भावूक केले. तर अभिजीतच्या बडबडीपासून सुटका केल्याचे सांगत एन्ट्रीबद्दल नेहाने वीणाचे आभार मानले.

‘देवयानी’ फेम शिवानी सुर्वेने हटके अंदाजामध्ये एन्ट्री केली. यावेळी तिने ‘ही पोली साजूक तुपातली’वर नृत्य सादर केलं. शिव ठाकरे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, ज्येष्ठ अभिनेते विद्याधर उर्फ बाप्पा जोशी, शेफ पराग कान्हेरे, मैथिली जावकर, माधव देवचक्के, रुपाली भोसले आणि अभिनेता अभिजित केळकर यांनी आपले जबरदस्त परफॉर्मन्स देत बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळवला.

Leave a Comment