यावेळेस टीम इंडियाला हमखास पराभूत करणार पाकिस्तान – इंजमाम उल हक


कराची – ३० मे पासून इंग्लंडमध्ये आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. क्रिकेटविश्वातील पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान या विश्वचषक स्पर्धेत १६ जूनला मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफॉर्ड क्रिकेट स्टेडियमवर समोरासमोर येणार आहेत. पाक क्रिकेट निवड समितीचे प्रमुख इंझमाम उल-हक यांनी या महत्वाच्या लढतीपूर्वी या विश्वचषक स्पर्धेत आमचा संघ भारताला नक्कीच पराभूत करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

इंझमाम म्हणाला, की भारताला पराभूत करण्यासाठी सध्याचा पाक संघ हा पूर्णपणे सक्षम असून विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध आजवर झालेल्या ६ पराभवाची मालिका खंडित करेल असा विश्वासही त्यांने व्यक्त केला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारताविरुद्ध आजवर पाक क्रिकेट संघाला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही.

भारत – विराट कोहली (कर्णधार) शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

पाकिस्तान – सर्फराज अहमद (कर्णधार), बाबर आजम, फखर जमान, इमाम उल हक, हॅरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हफीज, इमाद वसीम, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, शादाब खान, शोएब मलिक आणि वहाब रियाज.

Leave a Comment