केवळ बातम्यांमध्ये झळकण्यासाठी ममता बॅनर्जींचा ड्रामा – मुकुल रॉय


कोलकाता – केवळ बातम्यांमध्ये झळकण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे नेते मुकुल रॉय यांनी केली.

मुकुल रॉय पुढे म्हणाले, या लोकांना जोपर्यंत जनता बाजूला करत नाही, तृणमूल काँग्रेसचे नेते तोपर्यंत आपले पद सोडणार नाहीत. तृणमूल काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मोठा परावभ पत्करावा लागला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या पार्श्वभूमीवर राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण, पक्षाकडून हा प्रस्ताव अमान्य करण्यात आला.

रॉय यावर म्हणाले, शनिवारी आम्ही एक ड्रामा पाहिला. मुख्यमंत्री यात माध्यमांमध्ये झळकण्यासाठी राजीनामा देत आहे. पण, स्वतःच राजीनामा लिहून त्यांनी स्वतःला देऊन तो स्वतःच अमान्य केला. ममता बॅनर्जी कधीच राजीनामा देणार नाही, त्या कधीच सत्तेच्या लोभाचा त्याग करणार नाहीत. लोक त्यांना जोपर्यंत नाकारत नाही, त्या तोपर्यंत राजीनामा देणार नसल्याची टीका रॉय यांनी केली.

Leave a Comment