महिला कार घेण्यासाठी पोहचली १३ लाखांची नाणी घेऊन


बीजिंग – कार विकत घेण्यासाठी चीनमधील कांगझोऊ शहरातील एक महिला शोरुममध्ये गेली होती. १५ हजार पाऊंडची (सुमारे १३ लाख रुपये) नाणी तिने सोबत आणली होती. शोरुमच्या १७ कर्मचाऱ्यांना ती मोजण्यासाठी तीन दिवस लागले.

शोरुमचे मॅनेजर जियाओ यांनी सांगितले, कार विकत घेणारी महिला व्यावसायिक असून जी कार तिला घ्यायची हाेती, तिची किंमत १९.५ लाख रुपये होती. नाण्यांनी भरलेल्या ६६ बॅगा ती सोबत घेऊन आली होती. १३ लाखांची नाणी त्यात हाेती. जियोओ यांनी सांगितले, ग्राहकास आम्हाला परत पाठवयाचे नसल्यामुळे नाणी मोजण्याचा निर्णय घेण्यात आला. नाणी मोजण्यास सलग तीन दिवस लागले. कर्मचाऱ्यांच्या हाताना नाणी मोजताना काळा रंग लागला होता. महिला म्हणाली, मी व्यावसायिक आहे. ही नाणी तिची १० वर्षांची बचत हाेती. तिच्याजवळ नोटा नव्हत्या. त्यामुळे नाणी आणली असे ती म्हणाली.

Leave a Comment