22 कॅमेरे लावून हेरगिरी करणाऱ्या पतीचे पत्नीने बॅटने फोडले डोके


कर्नाटक : असे काही कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये घडले जे ऐकून सर्वचजण खूप हैराण झाले आहेत. यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार आपल्या घरात एका व्यक्तीने 22 हिडन कॅमेरे, एक प्रायव्हेट डिटेक्टिव आणि एक स्वायवेयर सेलफोन ठेवला होता. तो जेणेकरून आपल्या पत्नीवर नजर ठेऊ शकेल. त्याच्या पत्नीवर तो खूप संशय घ्यायचा. पत्नीच्या प्रत्येक कॉल आणि मॅसेजची तो माहिती ठेवायचा. पत्नीला जेव्हा याबाबत कळाले तेव्हा तिने पतीचे रागाच्या भरात बॅटने डोके फोडले. घटस्फोटासाठी दोघांनी अर्ज दाखल केला आहे.

घटनेबाबत पत्नीने सांगितले की, पतीच्या अशा व्यवहारानंतर ती त्याच्यासोबत राहू इच्छित नाही. तसेच पतीचे म्हणणे आहे की, पत्नीने सुंदर चेहऱ्याला बिघडवले आहे म्हणून त्याला तिच्यासोबत राहायचे नाही. 2007 मध्ये दोघांची पहिली भेट झाली होती. लग्नासाठी तो मुलगी पाहायला गेला होता. पण मुलीची धाकटी बहीण त्याला आवडली होती. पण ती तेव्हा शिकत होती. तेव्हा लग्नासाठी नकार दिला गेला. पण दोघांमध्ये बातचीत सुरु झाली होती. त्यांचे 2010 मध्ये लग्न करून दिले गेले. दोघांमध्ये 11 वर्षांचे अंतर होते.

सर्वकाही सुरुवातीचे दोन वर्षे चांगले होते. एक मुलगादेखील त्यांना झाला. पण काही वर्षांनंतरच त्याला पत्नीवर संशय येऊ लागला. त्याचा जॉब त्याने सोडला आणि पत्नीवर नजर ठेवायला सुरुवात केली. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्याने छोटे-छोटे कॅमेरे लावले. त्याने पत्नीला एक फोन गिफ्ट केला ज्यामध्ये एक स्वायवेअर लावलेले होते. ज्यामुळे तो पत्नीची जासूसी आरारामात करू शकत होता.

हे प्रकरण तेव्हा घडले जेव्हा त्याने पत्नीच्या फोनमधून फोटो काढून एका व्यक्तीबद्दल विचारले खरे तर तो पत्नीचा पुतण्या होता. त्यांनतर पत्नीला कळाले की, पती तिच्यावर नजर ठेवत आहे. तेव्हा पत्नीने पतीच्या डोक्यावर बॅट मारली. ज्यामुळे त्याचे डोके फुटले. जखम ठीक झाल्यावर कौन्सेलरकडे गेले. पण त्यांनंतरही त्यांच्या आयुष्यात काहीच बदल झाले नाही. आता दोघांनाही घटस्फोट हवा आहे.

Leave a Comment