राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल पायल रोहतगीचे वादग्रस्त ट्वीट!


गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पायल रोहतगी ही आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत होती. त्यानंतर ती आता पुन्हा एकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. तिने तिच्या ताज्या ट्विटमध्ये थेट महान समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त मत मांडले. इंग्रजांचे राजा राममोहन राय हे ‘चमचे’ म्हटले. त्याचबरोबर तिने यावेळी सती प्रथेचे समर्थनही केले.

22 मे रोजी राजा राम मोहन रॉय यांचा एक फोटो ट्विटरवरील इंडियन हिस्टरी पिक्स नावाच्या एका अकाउंटवरून शेअर झाला होता. सतिप्रथेचे कट्टर विरोधक आणि समाज सुधारक असे कॅप्शन त्याला देण्यात आले होते. हे ट्विट शेअर करत पायल रोहतगी हिने राजा राममोहन रॉय यांच्यावर टीका केली.


ते इंग्रजांचे चमचे होते. इंग्रजांनी राजा राममोहन रॉय यांचा सती प्रथेला बदनाम करण्यासाठी वापर केला. देशात कुठेच सती परंपरा सक्तीची नव्हती. हिंदू महिलांना मोगल शासकांद्वारे वेश्यावृत्ती ढकलण्यापासून वाचवण्यासाठी या प्रथेचा जन्म झाला. स्वत:च्या मर्जीने महिला सती जात. सती जाणे कुठल्याही प्रकारे चुकीची वा प्रतिगामी प्रथा नव्हते, असे ट्विट पायलने केले आहे.

पायलच्या पोस्टनंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि पायलला अनेकांनी फैलावर घेतले. एका युजरने तर थेट मुंबई पोलिसांना टॅग करत, पायलचे हे वक्तव्य थेटपणे गुन्हा असून याप्रकरणी तिच्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्य एका युजरने पायलला ट्रोल करत इंग्रजी पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Comment